Mahatet in 2024 registration: परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासननिर्णय परिषदेच्या वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सुचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, आणि परीक्षेची वेळ याबाबतची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, आवश्यक माहिती, आणि सूचनांसाठी उमेदवारांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षेचे वेळापत्रक-
या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 असणार आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 एवढा कालावधी मिळणार आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे.

जाहिरातीच्या पीडीएफची लिंक-
https://mahatet.in/Notices/Advertisement/ShowAdvertisement
परीक्षेबद्दल परिषदेकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना-
- परीक्षाविषयक सर्व माहिती जसे की आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मुल्यमापन व निकाल या सर्व बाबींची सविस्तर माहिती तसेच शासननिर्णय परिषदेच्या अधिकृत वेबसाईट https://mahatet.in वर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा.
- अर्ज भरताना, परीक्षार्थींनी इ. १०वी, इ. १२वी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्ग असल्यास जात इत्यादी संबंधित माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. तसेच, स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणा पत्र, आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करण्यासाठी सोबत ठेवावे.
- परीक्षेतील उमेदवारांशी संपर्क ई-मेल किंवा SMS द्वारे होऊ शकतो, त्यामुळे ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक अचूक भरावा व सुरक्षित ठेवा. पेपर I (प्राथमिक स्तर) आणि पेपर II (उच्च प्राथमिक स्तर) दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एकाच ठिकाणी बैठक व्यवस्था होण्यासाठी दोन्ही स्तराचे विकल्प निवडावा, स्वतंत्र अर्जाची आवश्यकता नाही.
- या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइनच करता येईल. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच (बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ.) भरावे लागेल. (चलनाद्वारे शुल्क भरता येणार नाही.) अर्ज अंतिम झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, तसेच कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख येईपर्यंत परीक्षा शुल्क भरावे लागेल. शुल्क न भरल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ऑनलाइन अर्जासोबत कागदपत्रांच्या प्रत जोडण्याची आवश्यकता नाही आणि कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याचीही गरज नाही.
- परीक्षेस तात्पुरता प्रवेश मिळेल आणि निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी केली जाईल. जर कागदपत्रे अपूर्ण असतील किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर उमेदवारी रद्द केली जाईल. आवेदनपत्रातील माहिती आणि मूळ कागदपत्रातील तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द होईल.
- अर्ज एकापेक्षा अधिक वेळा भरल्यास शेवटचे अर्ज ग्राह्य धरले जाईल आणि आधी भरलेल्या अर्जाचे शुल्क परत केले जाणार नाही.
- सन २०१८ व २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी www.mscepune.in वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी यादीत आपले नाव आहे का याची खात्री करावी आणि आवेदनपत्रात वस्तूनिष्ठ माहिती भरावी. चुकीची माहिती भरल्यास परीक्षेत सहभागी होण्याची संधी रद्द केली जाईल आणि कायदेशीर कारवाईसुद्धा होईल.
- सदर परीक्षेशी संबंधित सर्व अपडेट्स संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होतील, त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा
डिजिटल एक्स्पर्ट सर्विसेस, ZP शाळेच्या समोरच्या चामोर्शी रोड गडचिरोली.