RTE 25% Admission 2024 आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

RTE 25% Admission 2024 आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

RTE म्हणजेच  शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. RTE Admission 2025- 26 : आपण आतापर्यंत RTE शब्द […]

RTE म्हणजेच  शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 टक्के जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात.

RTE Admission 2025- 26 : आपण आतापर्यंत RTE शब्द बऱ्याचदा ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ प्रत्येकालाच माहिती असेल असं नाही. आरटीईचा फुल फॉर्म – Right To Education म्हणजेच शिक्षणाचा अधिकार असा होय. हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो. भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला आहे. आता या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात 2024-25 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

RTE अधिनियमा अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया राज्य सरकारकडून ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. RTE अधिनियमानुसार 25% जागा खासगी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

RTE Admission 2025-26 Maharashtra आर टी ई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता संधी मिळते. शैक्षणिक वर्ष 2024-25 RTE प्रवेश प्रक्रियेत शाळांना 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या कला मध्ये नोंदणी करावी लागणार आहे.

प्रवेशाचा वर्गवयोमर्यादा
किमान वयकमाल वय
प्ले ग्रुप/नर्सरी3 वर्ष4 वर्षे 5 महिने व 30 दिवस 
ज्युनियर केजी4 वर्ष5 वर्षे 5 महिने व 30 दिवस 
सिनियर केजी5 वर्ष6 वर्षे 5 महिने व 30 दिवस 
इयत्ता १ ली6 वर्ष7 वर्षे 5 महिने व 30 दिवस 

👉 प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

 वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत वंचित घटक व दुर्बल घटकातील  मुले-मुली यासाठी  अर्ज करू शकतात.

 वंचित घटक : वंचित घटकात दिव्यांग विद्यार्थी, SC, ST, OBC, VJNT, SBC या सर्व मागास प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 दुर्बल घटक : वरील समाजघटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होऊ शकतो. ज्यांचे  वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

 👉 अर्जांची निवड कशी होते?

प्राप्त अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरी पद्धतीने होते

लाभार्थी हा अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त जवळ तितकी अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते.

 📄 आवशयक कागदपत्रे :

  • लवकरच शैक्षणिक सत्र 2025-26 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
  • रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
  • राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  • दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
  • अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
  • RTE Admission 2025-26 Maharashtra ऑनलाईन प्रवेश करिता लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे पर्यंतची असणे अनिवार्य आहे. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत याची दक्षता घ्यावी.

आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे. फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा.

Share

Picture of digitalsexpert.in

digitalsexpert.in

Digital Expert Services

Your website and your client’s websites are precious. You need to trust in the products that power them and now we provide small informative free website design services.