आता शेतकऱ्यांच्या शेतीची एक फार्मर आय डी (किसान ओळख क्रमांक) तयार केला जाणार आहे (सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शेतीचे आधार कार्ड)
⬛️ काय असणार या फार्मर आय डी मध्ये?
- या मध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती जसेकी (नाव, गाव, पत्ता) शेतजमिनीचा तपशील असणार आहे (सर्वे नंबर, खाते नंबर, जमिनीचे क्षेत्र इ.) व शेतकऱ्याला एक विशिष्टी क्रमांक उपलब्ध करून दिला जाणार आहे
⬛️ फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) चा काय/कसा उपयोग होणार?
- फार्मर आयडी चा वापर करून अनेक सरकारी योजना आणि सेवांचा सहज लाभ घेता येणार
- डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांची पीक व पिकाचे मर्यादिनुसार केसेसी कर्ज मिळवता येणार
- हवामानाच्या आधारे किडा व रोगाचा रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार
- फार्मर आयडी चा वापर करून वापर करून मृदा आरोग्य बदल योग्य माहिती समजून घेता येणार जेणेकरून आपल्या शेतातील माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे समजून घेता येणार आहे
- शेतकऱ्याला एकाच पर्यायांमध्ये अनेक सरकारी योजना चा लाभ मिळवण्यास मदत होणार आहे
- भारत सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे
- महाडीबीटी वरील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी चा उपयोग होणार आहे
⬛️ कशी मिळवायची फार्मर आय डी?
ही आय डी मिळवण्यासाठी शासनामार्फत एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आय डी मिळवता येणार आहे.
⬛️ आवश्यक कागदपत्रे
शेतकरी आधार कार्ड (आधारला मोबाईल नंबर लिंक असावे)