Shipai Bharti 2024 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी ! तुम्ही जर फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे, शिपाई व इतर पदासाठी ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिनांक 16 मे 2024 पासून ते 31 जुलै 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही तर यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत तसेच ऑनलाईन अर्जाची एक प्रत देखील आपल्याकडे ठेवायची आहे.
ही भरती प्रक्रिया एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड अंतर्गत राबवली जात असून (Peon Job) चपराशी आणि टोल हेल्पर पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
ही भरती प्रक्रिया एकूण 40 रिक्त जागांसाठी होणार असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्या टप्प्यावर रद्द केली जाईल.
मूळ जाहिरात : https://shorturl.at/FrgVn
ऑनलाईन अर्ज : https://shorturl.at/FrgVn